साठरे हे रत्नागिरी तालुक्यातील एक सुंदर आणि प्रगतिशील गाव आहे, जे रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या गावाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 501.45 हेक्टर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार साठरे गावाची एकूण लोकसंख्या 1,472 असून त्यापैकी 681 पुरुष आणि 791 स्त्रिया आहेत. साठरे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत साठरे आणि ठोंबरेवाडी अशी दोन महसूल गावे समाविष्ट आहेत. गावात साठरेमध्ये 853 आणि ठोंबरेवाडीत 436 असे एकूण 1,289 मतदार आहेत, तसेच 593 कुटुंबे वास्तव्यास आहेत.
शैक्षणिक सुविधांमध्ये गावात 2 अंगणवाड्या आणि 3 प्राथमिक शाळा आहेत. येथे सब पोस्ट ऑफिसची सुविधाही उपलब्ध आहे. या गावातील शेतकरी पारंपारिक भातशेतीसोबत कलिंगड, भुईमुग, कुळीथ, चवळी, वाल आणि विविध पालेभाज्यांची शेती करून आर्थिक स्थैर्य आणि प्रगती साधत आहेत.
						श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
						श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
						श्री.अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
						श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
						श्री. उदय सामंत
मा. मंत्री, उद्योग
तथा मा. पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा
						श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री,
ग्रामविकास व पंचायतराज विभाग
						श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी
						श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद